भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदी केतन महामुनी यांची नियुक्ती
मुंबई : मुंबई नरिमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश संलग्न भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पत्र प्रदान सोहळा पार पडला. या कार्यक्रमास प्रदेश महामंत्री श्री. विक्रांतजी पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मराठी चित्रपट सृष्टी तसेच माध्यमक्षेत्रात कार्यरत असणारे पुण्यातील केतन महामुनी यांना कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ हरगुडे तसेच चित्रपट आघाडी संयोजक समीर दीक्षित यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. भविष्यात चित्रपट सृष्टीतील सर्व असंघटित कामगारांसमवेत निर्माता, कलाकार दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी चित्रपट कामगार आघाडीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे महामुनी यांनी सांगितले. तसेच या क्षेत्रातील कलाकार, कामगार, तंत्रज्ञ यांना मोठ्या प्रमाणात भाजपा चित्रपट कामगार आघाडीत सामील होण्याचे आवाहन हि त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी भाजपा कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ हरगुडे यांनी यावेळी नवनियुक्त कार्यकारीणीला विशेष मागदर्शन केले. चित्रपट आघाडी प्रदेश संयोजक समीर दीक्षित यांनी याप्रसंगी नवनियुक्त कार्यकारीणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्माता किशोरीताई शहाणे यांनी भाजपा चित्रपट कामगार आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यांची वरिष्ठ उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
याप्रसंगी सुप्रसिद्ध दिग्दर्शक एन. चंद्रा, नाटक निर्माते व समाज सेवक अनंत पणशीकर, दिग्दर्शक रमेश मोरे, निर्माते दीपक रुईया, अभिनेते कासम अली, डिझायनर आत्मानंद गोलतकर, निर्माते-आयटी प्रोफेशनल सचिन पैठणकर, चित्रपट कामगार कायदा सल्लागार अजय पाटोळे, निधी सल्लागार सदानंद शेट्टी, कायदा जुबी मॅथ्यू, प्रदेश प्रभारी सत्यवान गावडे, सहसंयोजक प्रीती व्हिक्टर, गीतांजली ठाकरे, नितीन कोदे, संचित यादव, प्रदेश समन्वयक शौकत पठाण, शिरीष राणे, चंद्रकांत विसपुते, रवींद्र महाडिक तसेच सर्व प्रमुख नवनियुक्त पदाधिकारी आणि हिंदी – मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळी यावेळी उपस्थित होते.