पुण्यात नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; कंटेनर पलटी

पुणे: नवले पुलाजवळ नव्या बोगद्यातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटला आणि तो कठड्यावर अडकून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमारास बंगळुरू मुंबई महामार्गावर झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या आहेत.

कात्रज कडून मुंबईच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर दुभाजकावर आढळला या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली आहे. दरम्यान कंटेनर खाली अडकलेल्या चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या आहेत. पोलीस व अग्निशामन दलाच्या मदतीने कंटेनर रस्त्याच्या कडेला हटवण्याचे काम सुरु आहे.

सिंहगड रस्ता वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उदय शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम दर्शनी ही चालकाची चूक आहे असे दिसते भरधाव वेगाने धावून येणारा हा कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे हा अपघात झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाने अडकलेल्या चालकांची सुखरूप सुटका करून त्याला नजीकच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!