बीजेपीच्या विरुद्ध सगळ्यांनी एकत्र राहावे म्हणून हळूहळू हालचाली चालू आहते, केजरीवाल-उद्धव ठाकरे भेटीवर भुजबळांची प्रतिक्रिया

नुकतीच उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची भेट झाली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगाने काढून घेतले असले, तरी शिवसेनाप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच मानतात. भाजपच्या विरुद्ध सगळ्यांनी एकत्र राहावे म्हणून हळूहळू हालचाली चालू असल्याची प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.

भुजबळ हे नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि केजरीवाल भेटीवर भाष्य केले.  उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगाने काढून घेतले असले, तरी शिवसेनाप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच मानतात. भाजपच्या विरुद्ध सगळ्यांनी एकत्र राहावे म्हणून हळूहळू हालचाली चालू आहेत. वर्षभरात निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे हालचालींना प्रारंभ झाला आहे. दक्षिण भारतातील मंडळी देखील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरु आहेत. सगळे पक्ष एकत्र येणे आवश्यक आहेत.
महागाईचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, नोटबंदी विरोधी बोलणाऱ्यांवर कारवाई असेल या सगळ्या गोष्टींचा मारा होत आहे. नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहेत. लोकशाहीवर प्रेम आहे, त्यांना असे आवडत नाही. त्यामुळे लहान लहान पक्ष देखील भाजप विरोधात सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत असे भुजबळ यांनी म्हटले.