कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या युती सरकार सदैव पाठीशी – चंद्रकांत पाटील

7
मुंबई : आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी कांदा प्रश्नावरून गोंधळ घातला. सभागृहाच्या पायऱ्यांवर देखील बसून विरोधकांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात या प्रश्नावर उत्तर दिले. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये असे नमूद केले आहे कि, नावनोंदणीत अडचणी लक्षात येताच ऑफलाइन नोंदणीही सुरू करणाऱ्या युती सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. नाफेडमधून कांदा खरेदी सुरू झालीये तर बंद असलेली केंद्रही लवकरच सुरू होतील.बळीराजाचं हित जपणार, आपलं युती सरकार…! असेही पाटील यांनी म्हटले आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय पुढीलप्रमाणे :-
१. नाफेडकडून कांदा खरेदी सुरु
२. आतापर्यंत २. ३८ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी
३. बंद खरेदी केंद्रही लवकरच सुरु होणार
४. कांदा निर्यातीवर कसलीही बंदी नाही
५. कांदा शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार मदत जाहीर होणार
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाचे चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवेदनात नेमकं काय म्हणाले ? 
मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. 2.38 लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला असून जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल . कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.