वीज आणि गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक

10
अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी कांदा आणि कापसाचा मुद्दा लावून धरल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी वीजेच्या आणि गॅस दरवाढ प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.चोर मचाये शोर अशा आशयाचे बॅनर फडकवून वीज प्रश्नावर आघाडी सरकारच्या काळात आंदोलन करणार्या आमदार प्रसाद लाड, राम सातपुते, प्रवीण दरेकर यांचा निषेध करण्यात आला.
शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा, घरगुती गॅस दरवाढ करणार्या सरकारचा धिक्कार असो, शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, महाराष्ट्राची बत्ती गुल, खोके सरकारचे खिसे फूल, अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
कांदा आणि कापूस या विषयावरून काल सभागृहात विरोधकांनी  गोंधळ घातला. आज वीज आणि गॅस दरवाढीवरून विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर गोंधळ घातला. आज नेमकं सभागृहात काय होणार हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.