भविष्यात कोणतीही अडचण असल्यास ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या कोथरूड मतदारसंघातील बाणेर भागातील अथश्री सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येवर उपाययोजना केली आहे. तेथील ज्येष्ठ नागरिकांसाठी बस स्टॉप पर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची आज चंद्रकांत  पाटील यांनी  सोय करून दिली आहे.

कोथरूड मतदारसंघातील बाणेर भागातील अथश्री सोसायटी ही ज्येष्ठ नागरिकांची सोसायटी असून, काही महिन्यांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी येथे भेट दिली होती. या भेटीत सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांनी बस स्टॉप पर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी ही अडचण दूर करण्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. आज याची वचनपूर्ती होत असून लोकसहभागातून ई-व्हेईकल उपलब्ध करून दिली.

या ई-व्हेईकलचे लोकार्पण आज चंद्राकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. भविष्यात ही कोणतीही अडचण असल्यास ती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना आश्वास्त केले.

यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, ओबीसी मोर्चाचे प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, अथश्री सोसायटीचे वैशाली वैद्य, विनय केतकर यांच्या सह सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!