कोथरुड – बाणेर मधील ग्रीन्स कॉलनी येथील श्रीराम उद्यानात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या शेडचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या पूर्ण करण्याचा पाटील यांचा नेहमीच प्रयन्त असतो. याच हेतूने बाणेर मधील ग्रीन्स कॉलनी येथील श्रीराम उद्यानात शेड तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आणि लोकसहभागातून ते पूर्ण देखील केले. या शेडचे रविवारी पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
कोथरुड – बाणेर मधील ग्रीन्स कॉलनी येथील श्रीराम उद्यानात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या शेडचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, सरचिटणीस विवेक मेथा, भाजपा शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, शिवम सुतार, रोहन कोकाटे, सुभाष भोळ, अनिकेत चांदेरे, सरला शिंदे, राजवाडे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.