आगामी काळात कोथरूड विधानसभा मतदारसंघातील १० हजार महिलांना उद्योजिका बनवण्याचा संकल्प – चंद्रकांत पाटील

16

पुणे : कोथरुड विधानसभा मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी-पाषाण मधील महिला बचत गटांसाठी “जागर स्त्री सामर्थ्याचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत माता भगिनींना मार्गदर्शन केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहे. या अंतर्गत गेल्या पाच वर्षांत अनेक महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळवून दिले. आगामी काळात कोथरूड विधानसभा मतदारसंघातील १० हजार महिलांना उद्योजिका बनवण्याचा संकल्प असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी कार्यक्रमाच्या आयोजिका सुजाता धनकुडे, हर्षदा थिटे, सुमन रेडवाल, भाजप उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, लहु बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, उमाताई गाडगीळ, विद्याताई बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, शिवम बालवडकर, विवेक मेथा, सचिन दळवी, प्रमोद कांबळे, संदीप तापकीर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अस्मिता करंदीकर, अंकिता दळवी, वैदेही बापट, वैशाली कमाजदार यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.