शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे आयोजित ‘नृत्य वंदना’ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा – चंद्रकांत पाटील

6

मुंबई  : आपला भारत नृत्याविष्काराने नटलेला देश आहे. आपली हीच नृत्य संस्कृती अबाधित राखण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे ‘नृत्य वंदना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

आपल्या संस्कृतीची मान उंचावणं हेच आपलं आद्यकर्तव्य असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील आयोजित शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था , पुणे प्रस्तुत ‘नृत्यवंदना’ या कार्यक्रमाचे येत्या २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे. पंडित फार्म , डी . पी. रोड , कर्वेनगर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सांस्कृतिक , पर्यटन मंत्री जी. किसन रेड्डी तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. गुरु शमा भाटे , गुरु मनीषा साठे, गुरु सुचेता चापेकर यांचे प्रमुख मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.