उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने गरजू महिलांना चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते साडी वाटप

41

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आशिष गार्डन येथे कोथरूड मतदारसंघातील शास्त्रीनगर, सुतारदरा आणि कर्वेनगर परिसरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नावनोंदणी केलेल्या २,५०० महिलांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक साडी भेट म्हणून देण्यात आली.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्यासह अमोल बालवडकर आणि अमोल बालवडकर फाउंडेशनचे सभासद व इतर मान्यवर आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.

महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ घोषित केली असून या योजनेंतर्गत महिला भगिनींच्या खात्यावर दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेच्या अनुषंगाने अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून नाव नोंदणी अभियान सुरू असून या अभियानाच्या अंतर्गत नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येक महिला भगिनींना साडी भेट दिली जात आहे. तरी जास्तीत जास्त महिला भगिनींनी नावनोंदणी करून महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन महिलांना साडी वाटप करून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.