पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोथरूड येथील शोभायात्रेत सहभाग… कोथरुडकरांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

पुणे : कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर राज्यात सर्व सण – उत्सव जोमाने साजरे करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे बुधवारी गुढी पाडवा देखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आल्या. पुण्यात तर या शोभायात्रांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील कोथरूड येथील शोभायात्रेत सहभाग घेतला आणि कोथरुडकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिला.

चंद्रकांत पाटील यांनी आपला उत्साह ट्विट करत व्यक्त केला . ते म्हणाले कि, पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी, त्यातही कोथरुड म्हणजे या सांस्कृतिक राजधानीचं माहेरघर! त्यामुळे आपल्या संस्कृतीचे वैभव असलेले सण इथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गुढीपाडव्यानिमित्त चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात मराठी नववर्षाचे स्वागत शोभायात्रेने करण्यात आले.

या शोभायात्रेत सर्व कोथरुडकर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते. अनेक बालमित्र महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. तर काहींनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करुन सर्वांचेच लक्ष वेधले. चंद्रकांत पाटील यांनी या शोभायात्रेत सहभागी होऊन कोथरुडकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!