मुलांमध्ये सहलीच्या माध्यमातून आसपासच्या परिसराविषयी माहिती देणं आणि भारतीय मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करण्याचा उद्देश – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : ‘मामाच्या गावाला जाऊया’ या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये सहलीच्या माध्यमातून आसपासच्या परिसराविषयी माहिती देणं आणि भारतीय मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करण्याचा उद्देश असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. आज कोथरुडमध्ये संस्काराचे मोती – आईची गोष्ट या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील आज संस्काराचे मोती – आईची गोष्ट या अभिनव स्पर्धेदरम्यान उपस्थितीत राहिले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले कि, लहान मुलांसाठी उन्हाळ्यात मामाच्या गावाला जाणं हा वेगळाच आनंदाचा विषय असतो. याकाळात मुलांना आपले छंद मनसोक्तपणे पूर्ण करता येतात. सहलींसोबत भारतीय मैदानी खेळ कमी झाल्यामुळे, मामाच्या गावाला जाऊया उपक्रम कोल्हापूरला सुरू केला. तसाच उपक्रम पुण्यातही सुरू करणार असल्याचे पाटील म्हणाले. या माध्यमातून मुलांमध्ये सहलीच्या माध्यमातून आसपासच्या परिसराविषयी माहिती देणं आणि भारतीय मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करण्याचा उद्देश असल्याचेही पाटील म्हणाले.

यावेळी स्पर्धेच्या संयोजिका माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अयक्ष पुनीत जोशी, सरचिटणीस अनुराधा एडके, मिताली सावळेकर,माजी नगरसेविका डॉ.‌श्रद्धा प्रभुणे पाठक, सौ.वासंती जाधव व सौ. हर्षाली माथवड उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!