स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व भारतीयांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही – चंद्रकांत पाटील

6

पुणे : प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, या भारतभूमीचा स्वाभिमान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ रविवारी  कोथरूड मतदारसंघात भव्य सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी  पुण्यातील सावरकरप्रेमी समुदाय मोठ्या संख्येने या यात्रेत सामील झाला होता. सावरकरांचे ज्वलंत विचार अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सततच्या होणाऱ्या अपमानाविरोधात आपला निषेध व्यक्त केला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व भारतीयांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, अशा भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. भारतीय जनता पार्टीने नेहमीच सर्व महापुरुषांचा आदर केला आहे. राज्यातील सर्व महापुरुषांच्या स्मारकांसाठी केवळ घोषणा न करता जागतिक दर्जाच्या कामांसाठी सुद्धा कोणताही भेदभाव न ठेवता आम्ही कार्य करीत आहोत, असेही पाटील म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिबा फुले असतील , कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहेच. सगळ्या प्रकारच्या जयंत्या , पुण्यतिथ्या आम्ही मोठ्या प्रमाणावर साजरा करतोच. इंदू मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक कोणी पूर्ण केलं ? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. हे सगळं देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन ते पूर्ण केलं. त्यामुळे डॉ. आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोरडा आदर दाखवू नका असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.