बहुउद्देशीय ऑलिसीड्स एक्सट्रॅक्शन अँड व्हेजिटेबल ऑईल रिफायनिंग प्लँट’ चे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

मुंबई  : मुंबईतील माटुंगा येथे आज बहुउद्देशीय ऑलिसीड्स एक्सट्रॅक्शन अँड व्हेजिटेबल ऑईल रिफायनिंग प्लँट’ चे उद्घाटन संपन्न झाले . रसायन तंत्रज्ञान संस्था म्हणजे आयटीसी , माटुंगा येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या प्लँट’ चे उद्घाटन करण्यात आले.

चंद्रकांत पाटील आज मुंबईत दाखल झाले. त्यांनी आज बहुउद्देशीय ऑलिसीड्स एक्सट्रॅक्शन अँड व्हेजिटेबल ऑईल रिफायनिंग प्लँट’ चे उद्घाटन केले तसेच या संपूर्ण प्लँट ची माहिती देखील घेतली. चंद्रकांत पाटील यांना या प्लँट बद्दल प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष स्वतः देखील सहभाग घेत या मशिन्स कशा प्रकारे काम करतात याची पडताळणी देखील केली.

यावेळी संस्थेचे कुलगुरू प्रा.अनिरुद्ध पंडित, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलसचिव प्रा.राजेंद्र देशमुख, प्रा.अमित प्रताप यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते.