पुणेकरांसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश… मिळकतकरात ४० टक्के सूट लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार – चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 एप्रिल, 2023 पासून 40 टक्के मालमत्ता कर सवलत निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, सर्व पुणेकरांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले . तसेच जनभावनेचा आदर करुन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्व पुणेकरांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार देखील त्यांनी मानले.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, पुणे महानगरपालिकेत १९७० पासून मालमत्ता करामध्ये ४० टक्के सूट , सवलत देण्याची पद्धत होती. १९७० ते २०१० यामध्ये कुठेही आडकाठी आली नाही. २०१० नंतर सरकारच्या ऑडिटमध्ये त्याची चौकशी लागली. आणि २०१९ पासून हि ४० टक्के सवलत रद्द करावी असा निर्णय झाला. २०१९ पासूनची बिल ४० टक्के वाढून यायला लागली. अनेकांनी ती भरली तर अनेकांनी भरली नाहीत. १९७० पासूनची हि सवलत असल्याने स्वाभाविकपणे नागरिकांची हि मागणी होती हि सवलत आम्हाला कायम ठेवावी, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, हे सगळं सोपं काम नव्हतं. लोकांचा रेटा आणि वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अधिवेशन काळामध्ये मार्चमध्ये विधान भवनामध्ये एक मिटिंग झाली. या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिला कि, जो पर्यंत याचा कॅबिनेट मध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत हे वारंवार उपस्थित होत राहणार. आणि शेवटी आता कॅबिनेट मध्ये याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे हि ४० टक्के सवलत मालमत्ता करामधली ती पुणेकरांना लागू झाली. या दरम्यान २०१९ ते २०२३ यात ज्यांनी हे ४० टक्के भरले, ती त्यांना पुढच्या बिलामध्ये अड्जस्ट करून मिळेल. असा खूप महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!