कोथरूडमध्ये आज अवयवदान चळवळीत योगदान देणाऱ्या देवदूतांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन कि बात या रेडिओ कार्यक्रमाचा आज शंभरावा भाग प्रसारित झाला. भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले होते. या निमित्ताने आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. कोथरूडमध्ये आज अवयवदान चळवळीत योगदान देणाऱ्यांचा पुरस्कार देऊन  गौरव करण्यात आला.  यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या देवदूतांना सन्मानित केले.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक शंभराव्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे औचित्य साधून माझ्या कोथरुड मतदारसंघात आज एक भावस्पर्शी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अवयवदान चळवळीत अमूल्य योगदान देणाऱ्या देवदूतांचा मॉडर्न विकास मंडळाच्या माध्यमातून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित राहून देवदूतांना सन्मानित करण्याची संधी मला मिळाली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे संघटन सरचिटणीस मुख्यालय रवी अनासपुरे, पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, मनिषा बुटाला, ॲड. वर्षाताई डहाळे, यांच्यासह अवयवदान चळवळीतील देवदूत आणि नागरिक उपस्थित होते.