चंद्र्कांत पाटील यांच्या हस्ते बाल संकुल केंद्रातून विवाह होऊन गेलेल्या महिलांना साडीचा आहेर

कोल्हापूर :

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोल्हापूर येथील बाल संकुल केंद्रातून विवाह होऊन गेलेल्या महिलांना साडीचा आहेर देण्यात आला. या 25 महिला आणि त्यांची अपत्य यांच्यासाठी माहेरवाशीण उपक्रमाच्या माध्यमातून दोन दिवसांची कोकण सहल आयोजित करण्यात आली होती. या सर्व महिला बहिणींना मान सन्मान मिळाल्याने सर्वजणींनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला वेगळेच समाधान मिळाले अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

 

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय अग्रवाल, व्ही बी शेटे, स्वप्नील शेटे शुभांगी चौगले, शिरीष बोगार, वैशाली भोसले, अंजली वाघमारे, समीक्षा गायकवाड आदी उपस्थित होते.