जी-२० अंतर्गत मुलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या विषयावरील दोन दिवसीय पूर्वपरिषदेचे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवीजी यांच्या हस्ते उद्घाटन
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादांनी नव्या शैक्षणिक धोरणावर टाकला प्रकाश!

पुणे : जी-२० परिषदेच्या चौथ्या शिक्षण कार्य गटाचे चर्चासत्र १९ ते २१ जून दरम्यान पुण्यात होणार आहे. आज जी-२० अंतर्गत मुलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या विषयावरील दोन दिवसीय पूर्वपरिषदेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आले असून, या परिषदेचे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवीजी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
दोन दिवस चालणाऱ्या या सत्रांमुळे शिक्षणासाठी प्रगतीशील मार्ग तयार करण्यात मदत होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परिषदेस शुभेच्छा दिल्या तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये राज्य सरकारच्या योगदानाबद्दल माहिती दिली.
यावेळी मंत्रिमंडळातील राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह केंद्रीय शिक्षण विभागाचे सचिव आणि विविध राज्यांचे सचिव आणि शिक्षण तज्ज्ञ उपस्थित होते.