पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी टिफिन बैठकीत साधला भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद, तसेच एकत्रित भोजनाचा हि घेतला आस्वाद
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ वर्ष कार्यकाळ हा सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्व म्हणून भाजप विविध राज्यांमध्ये तसेच मतदारसंघांमध्ये अनेक उपक्रम राबवत आहे ज्यामध्ये लाभार्थी संमेलन तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत टिफिन बैठक देखील आहे.
याच अनुषंगाने पुण्यातील कोथरूड मतदारसंघामध्ये टिफिन बैठक आयोजित करण्यात आली होती. कोथरूडचे आमदार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या यशस्वी नेतृत्वात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कोथरूड मध्ये टिफीन बैठकीच्या माध्यमातून भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधून, एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतला. भारतीय जनता पक्ष हे एक कुटुंब आहे. त्यामुळे टिफीन बैठकीसाठी प्रत्येकांनी आपापल्या घरून आणलेल्या जेवणाच्या टिफिन मधील पदार्थांच्या देवाणघेवाणीसह माननीय मोदींजींच्या सेवा, सुशासन, गरीब कल्याण आदी विषयांच्या अनुषंगाने विस्तृत चर्चाही झाली असल्याचे पाटील यांनी सांगितले. आजचा हा उपक्रम सर्वांसाठी वैचारिक मेजवानीच होता असे हि ते म्हणाले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी तसेच भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व आघाडी महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
