राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी संस्थांना मार्गदर्शन करण्यासोबतच, आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करणार – चंद्रकांत पाटील

16

पुणे : आज पुण्यात मुक्तांगण इंग्रजी विद्यालयात पुणे विद्यार्थी गृह आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उच्च शिक्षणाच्या खाजगी संस्थांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यात व्यवस्थापनाची भूमिका’ या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे उद्धाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना पाटील यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी संस्थांना मार्गदर्शन करण्यासोबत त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी. जी.सीताराम, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष सुनील रेडकर यांच्यासह विविध खाजगी शिक्षण संस्थांचे व्यवस्थापन सदस्य, संचालक, प्राचार्य उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.