इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणी चंद्रकांत पाटील यांची भावुक पोस्ट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही फोन वरून घेतली घटनेची माहिती

7

मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळगड येथे काल मध्यरात्री दरड कोसळण्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना देखील पाटील यांनी केली आहे.पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधे आपल्या वैयक्तिक निधीतून एक लाख व लोकसहभागातून दहा लाख रुपयांची मदत देण्याचे हि यावेळी घोषित केले आहे.

घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी पहाटेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत उपस्थित होते. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाखांची मदत देण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या दुर्घटने नंतर प्रशासन युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य राबवित आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री श्री. एकनाजी शिंदे उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस देखील सातत्याने परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्यासाठी उपाययोजना राबवित आहेत. ज्या दुर्गम भागात पोहचण्यास अडचणी येत होत्या तेथे मंत्री श्री. गिरीश महाजन आणि आमदार महेश बालदी यांनी मध्यरात्रीच पोहचून मदत कार्यास सुरुवात केली असल्याची माहिती पाटील यांनी पोस्टच्या माध्यमातून दिली आहे

यासह केंद्रीय गृहमंत्री श्री.अमितभाई शाह यांनीही फोनवर संपूर्ण घटनेची माहिती घेतली असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. खरा नेता तोच, जो तळमळीने संकटकाळी धावून जातो, आपुलकीने विचारपूस करतो, धीर देतो. आपले उत्तरदायित्व समजून ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता रस्त्यावर उतरलेल्या माझ्या सर्व संवेदनशील सहकाऱ्यांना आणि वरिष्ठांना सलाम! असे म्हणत त्यांनी आपल्या सहकारी आणि वरिष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.