पुणे शहर राष्ट्रवादीचे नवनियुक्त अध्यक्ष दीपक मानकर यांनी घेतली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट
पुणे : महाराष्ट्र राज्यामध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतील अजित पवार गट सत्तेमध्ये सामील झाला. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासही आपण या महायुती मध्ये सामील झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. राज्यच्या उपमुख्यमंतरू आणि अर्थमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यावर अजित पवार यांनी दिल्ली येथे झालेल्या एनडीएच्या बैठकीला देखील हजेरी लावली. त्यामुळे अनेक जणांच्या भुवया उंचावल्या.
राज्यातील अनेक आमदार, स्थानिक पदाधिकारी यांनी अजित पवारांची स्टेज देण्याचे ठरविले. मागील आठवड्यात अजित पवार यांनी पुण्यातील दीपक मानकर यांची शहराध्यक्षपदी निवड केली. मानकर हे पुण्याचे उपमहापौर देखील राहून गेले आहेत. शहरात त्यांची पकड देखील चांगली आहे.
काल दीपक मानकर यांनीपुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पुढील स्थानिक स्वराज्यसंथांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि भेट महत्वाची मानली जाते. यावेळी राष्ट्रवादीचे नवनियुक्त अध्यक्ष दीपक मानकर यांचा पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पुण्याचे भाजपचे निवडणूक प्रभारी राजेश पांडे आणि प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.
