पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील ७० जिल्हाध्यक्ष आणि विविध आघाडीच्या प्रमुखांची नियुक्ती नुकतीच प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केली. यात प्रामुख्याने पुणे शहराचे अध्यक्ष म्हणून धीरज घाटे, पिंपरी-चिंचवड शंकर जगताप, पुणे ग्रामीण (मावळ) शरद बुट्टे पाटील, (बारामती) वासुदेव नाना काळे, किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्षपदी गणेश भेगडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री दिलीप कांबळे, कामगार आघाडी विजय हरगुडे, क्रीडा प्रकोष्ट संदीप आप्पा भोंडवे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
काल पुनेश्वर भाजप कार्यालयामध्ये पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पाटील यांनी सर पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री आणि प्रदेश कार्यालय मंत्री रवीजी अनासपुरे, पुणे शहर प्रभारी अमर साबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. भीमराव तापकीर, उमाताई खापरे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
