चंद्रकांत पाटील यांच्याकडून आयोजित “एका लग्नाची, पुढची गोष्ट” या सुप्रसिद्ध नाटकाचा प्रयोग बाणेर मध्ये संपन्न, रसिकांचा प्रयोगाला उदंड प्रतिसाद

7

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोथरूडकरांना नवनवीन कला सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच मेजवानी असते. पाटील यांनी बुधवारी खास कोथरुडकरांसाठी प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित तसेच सरगम प्रकाशित “एका लग्नाची, पुढची गोष्ट” या सुप्रसिद्ध नाटकाचा प्रयोग बाणेर मधील बंटारा भवन येथे आज आयोजित केला होता.  बाणेर मधील रसिकप्रेक्षकांनी या प्रयोगाला उदंड प्रतिसाद दर्शविला.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि,  माझ्या कोथरूडकरांना आनंदी पाहणे हा माझा संकल्प आहे. याच संकल्पाचा भाग म्हणून कोथरूवासीयांच्या आयुष्यात आनंदाची उधळण करण्यासाठी आजतागायत विविध उपक्रम राबविले आहेत. नाटक ही अशी अजरामर कला आहे ज्याद्वारे रसिकप्रेरक्षकांना निखळ आनंद मिळतो. म्हणून, कोथरुडकरांचे मनोरंजन व्हावे, आनंद मिळावा यासाठी प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित तसेच सरगम प्रकाशित “एका लग्नाची, पुढची गोष्ट” या सुप्रसिद्ध नाटकाचा प्रयोग बाणेर मधील बंटारा भवन येथे आज आयोजित केला होता, अशी माहिती पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी या प्रयोगासाठी बाणेर येथील बालेवाडी फाट्याजवळ पाटील यांच्या संपर्क कार्यलयात हा प्रयोग पाहण्यासाठी मोफत पासेस उपलब्ध केले होते. या प्रयोगास बाणेर मधील रसिकप्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दर्शविला.

Get real time updates directly on you device, subscribe now.