पुणे : आश्विन-कार्तिक महिना सुरु झाला की, मन भक्तिमय करणारे काकड आरतीचे सूर गावोगावी ऐकू येऊ लागतात. त्याचप्रमाणे शांत आणि मंद चालीतील परमेश्वराच्या अभंगाने प्रत्येकाचीच सकाळ अतिशय आनंदाने आणि उत्साहाने होत असते. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील काकड आरतीचा आनंद घेतात.
चंद्रकांत पाटील यांनी प्रतिवर्षीप्रमाणे भक्तिमय वातावरणात रंगून जात आनंद घेतला. . कोथरुड मधील कर्वेनगर भागातील विठ्ठल मंदिरात जाऊन विठूमाऊलीची मनोभावे पूजा करुन पाटील यांनी काकड आरती केली. यावेळी काकड आरतीसाठी जमलेल्या सर्व भाविकांसाठी प्रसाद सेवा करताना एक विलक्षण समाधान मिळाल्याचे पाटील यांनी म्हटले.