पुणे : देशातील गोरगरीबांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विविध योजना राबविल्या जात आहेत. आदरणीय मोदीजी सर्वसामान्यांना पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांबाबत संवेदनशील आहेत. याच आदर्शाचे पालन करून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील दोन रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून दिली.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, मंगेश कुडले आणि सुलोचना दळवी यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाखाची मदत मिळवून देण्यात आली आहे. या दोघांनाही उत्तमोत्तम उपचार मिळावेत, आणि त्यांना चांगले आरोग्य लाभावे ही प्रार्थना पाटील यांनी केली. तसेच ते पुढे म्हणाले कि, यापुढे देखील माझ्या कोथरूडमधील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असेन.