पुणेकरांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी सोमयाग आयोजनास सर्वोतोपरी मदत करणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

5

पुणे : कोथरुडमधील महात्मा सोसायटीत श्री क्षेत्र अक्कलकोटच्या स्वामी समर्थ पीठाचे चौथे पीठाधिश सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या पावन पादुकांचे आगमन झाले असून आज कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तेथे भेट देत दर्शन घेतले.या पादुकांचे दर्शन घेण्याचे परम भाग्य लाभले असल्याचे म्हणत यावेळी मंगल हवनाचे दर्शन घेऊन सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना पाटील यांनी सद्गुरू चरणी केली.
दरम्यान, पुणेकरांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी सोमयाग आयोजनाची इच्छा सर्व सद्गुरू भक्तांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे व्यक्त केली. यानुषंगाने सद्गुरू भक्तांच्या इच्छेखातर त्यांचा मान राखून सोमयाग आयोजनासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही चंद्रकांत पाटलांनी दिली.

यांनतर श्री १००८ श्री मज्जिनेंद्र जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव समिती सुस यांच्या वतीने आयोजित ‘पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव’ आणि ‘विश्व शांती महायज्ञ’ कार्यक्रमात देखील पाटील याणी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी परमपूज्य निर्यापक मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराज, मुनिश्री १०८ विशालसागरजी महाराज, धवलसागरजी महाराज, उत्कृष्ट सागरजी महाराज यांना नारळ अर्पण करुन आशीर्वाद घेतले. तसेच सर्व बांधवांशी संवाद साधून सर्वांना पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी समितीने समाजाच्या विविध मागण्यांसदर्भात दिलेल्या निवेदनाचा शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही हि पाटील यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.