हा उत्सव खऱ्या अर्थाने ‘मैत्रीचा उत्सव’ असून पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करणारा – चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तरंग उत्सवास काल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी दीपप्रज्वलन करून त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उत्सवातील विविध दालनांना भेट देऊन दहशतवाद विरोधी पथकाचे प्रात्यक्षिकही पहिली.
हा उत्सव खऱ्या अर्थाने ‘मैत्रीचा उत्सव’ असून पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करणारा असल्याने नागरिकांनी या उत्सवात आवर्जून सहभाग घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी याप्रसंगी केले. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त संदीप गिल आदी उपस्थित होते.