२२ जानेवारी हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदोत्सव – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

3
पुणे : आपल्या सर्वांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांची येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या मंगलमय सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघा देश राममय झाला आहे. या भव्य मंदिरासाठी देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी समर्पण आणि योगदान दिले आहे. त्यामुळे प्रभूंच्या आगमनाचे निमंत्रण प्रत्येक भारतीयांना दिले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील खिलारेवाडी भागातील रामभक्तांना अक्षता देऊन श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमंत्रण दिले. येणारा २२ जानेवारी हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदोत्सव आहे. कित्येक वर्षांनंतर प्रभू श्रीराम पुन्हा मंदिरात विराजमान होत आहेत. त्यामुळे हा दिवस आपण सर्वांनी दिवाळी सारखा साजरा करावा असे आवाहन पाटील यांनी कोथरूडकरांना निमंत्रण देताना केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.