शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढीसोबतच सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीला प्राधान्य दिले पाहिजे –  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

17
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भीमा कृषी प्रदर्शनाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत प्रगतशील शेतकरी, आदर्श कृषी अधिकारी यांसह इतर पुरस्कारांचे वितरण केले. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
या कृषी प्रदर्शनात तब्बल दहा कोटी रुपयांचा मुऱ्हा जातीचा गोलू हा रेडा खास आकर्षण ठरला. अस्सल देशी जातीची विविध जनावरे,कृषी आणि कृषी पूरक अवजारे, खते,बी बियाणे,कीटकनाशके या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. 26 जानेवारी पासून आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल तीन लाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेती करावी असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
पाटील पुढे म्हणाले कि, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढीसोबतच सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीला प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे होत असलेले प्रबोधन निश्चितच कौतुकास्पद आहे अशी भावना देखील याप्रसंगी पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित कदम, राहुल चिकोडे अरुंधती महाडिक, भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक कृष्णराज महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.