चरित्र साधने प्रकाशन समित्यांनी संबंधित महापुरूषांवरील अप्रकाशित साहित्याचा शोध घेवून त्याचे प्रकाशन करून लोकांपर्यंत आणावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पाटील पुढे म्हणाले, लोकसाहित्य प्रकाशन समितीच्या माध्यमातून पहिले लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्याचे समितीने नियोजन करावे. त्यासाठी प्रस्ताव शासनास पाठवावा. सर्व महापुरूषांवरील समितीच्या माध्यमातून आलेल्या साहित्याचे अवलोकन करणारी पुणे विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांची यंत्रणा उभारण्यात यावी. राजर्षी शाहू महाराज यांच्यावरील तत्कालिन वर्तमानपत्रांमध्ये आलेले त्यांचे लेख, वृत्त, यांचा संग्रह करून खंड प्रकाशित करावा. त्यासाठी आर्थिक तरतूद मागणीचा प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी समित्यांचे सदस्य, संबंधित अधिकारी उपस्थित होते.