या भुयारी मार्गामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची तसेच अन्य घटकांची मोठी सोय होणार असल्याने काम उत्तम पद्धतीने आणि मुदतीमध्ये पूर्ण करावे -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरुपी जोडण्याकरिता निर्माण केला जाणाऱ्या भुयारी मार्गाच्या कामाचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले . या भुयारी मार्गामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची तसेच अन्य घटकांची मोठी सोय होणार असल्याने सदरचे काम उत्तम पद्धतीने आणि मुदतीमध्ये पूर्ण करावे, असे निर्देश पाटील यांनी याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच ठेकेदारांना दिले.