कोल्हापूर विमानतळासंदर्भात आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा याबाबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

21

कोल्हापूर : केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यानिमित्त कोल्हापूर विमानतळासंदर्भात आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.यावेळी खासदार धनंजय महाडिक देखील उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवरती व आतापर्यंत झालेल्या कोल्हापूर विमानतळाच्या विकासाबाबत तसेच भविष्यात हव्या असणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा करण्यात आली.

कोल्हापूर शहराला आरसीसी उडान योजनेअंतर्गत दिल्ली, नागपूर, गोवा, शिर्डी या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी हवाई वाहतूक सुरू करण्याबाबत मागणी केली. त्याचबरोबर रनवे एक्सापान्शनसाठी 380 कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी यावेळी केली. याप्रसंगी माजी आमदार मा. अमल महाडिक, एअरपोर्ट डायरेक्टर मा. अनिल शिंदे यांच्यासह एअरपोर्ट अथोरिटी व एअरलाइन्सचे कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्र विभागाची कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे या बैठक स्थळाची पाटील यांनी पाहणी करून नियोजनाबाबत आढावा घेतला.

Get real time updates directly on you device, subscribe now.