राज्याच्या अर्थव्यवस्थेत वस्त्रोद्योग क्षेत्राची महत्त्वाची भूमिका; या घटकांना चालना देण्यासाठी शासन सकारात्मक – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

7
मुंबई : राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या समितीच्या अहवालाचे प्रारूप आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले.
याप्रसंगी यंत्रमाग धारकांना (27 HP) ते (२०१HP) या प्रवर्गातील घटकांना प्रति युनिट 75 पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्याबाबत शासनाने प्रस्तावित केले आहे .याच धर्तीवर साध्या यंत्रमाग धारकांना (27HP ) खालील प्रति युनिट 75 पैसे वीज सवलत मिळण्याबाबची शिफारस गठीत समितीने केली आहे. याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा असे निर्देश पाटील यांनी या बैठकीत दिले.
पाटील म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेत वस्त्रोद्योग क्षेत्राची महत्वाची भूमिका  आहे. या घटकांना चालना देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेत आहे. साध्या यंत्रमागधारकांनी विविध बँका वित्तीय संस्थांकडून व्यवसायाकरिता घेतलेल्या मुदती कर्ज, कॅश क्रेडिट व खेळत्या भांडवलासाठी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावर 5 टक्के याप्रमाणे व्याज अनुदान देण्यात यावे याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगून याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.
यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकर, उपसचिव श्रीकृष्ण पवार संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.