मंत्रालयात ‘महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या’ नियामक परिषदेची ६ वी बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

11

मुंबई : महाराष्ट्राचा समृद्ध कला वारसा जपत असतानाच, आधुनिक काळातील तांत्रिक गरजांनुसार कला शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मंत्रालयात ‘महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या’ (MSBVA) नियामक परिषदेची ६ वी बैठक पार पडली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कला क्षेत्रातील प्रलंबित तांत्रिक व शैक्षणिक विषयांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

महाराष्ट्राचा समृद्ध कला वारसा जपतानाच, आधुनिक काळातील गरजा लक्षात घेऊन कला शिक्षणात कोणते बदल आवश्यक आहेत, यावर आम्ही भर दिला असल्याचे पाटील यांनी म्हटले. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे कला शिक्षण मिळावे, हाच आमचा प्रमुख उद्देश असल्याचे देखील पाटील यांनी या बैठकीत स्प्ष्ट केले.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिम चॅटर्जी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे तसेच नियामक परिषदेचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीतील निर्णयामुळे राज्यातील हजारो कला विद्यार्थ्यांना आणि संस्थांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.