नमो चषकच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा भाजपाचा प्रयत्न- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

5
पुणे : भाजपा पर्वती मतदारसंघ युवा मोर्चाच्या वतीने आयोजित नमो चषक २०२४ अंतर्गत स्पर्धेतील विजेत्यांचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करुन गौरव करण्यात आला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी खेळ आणि खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देतात. याचीच फलश्रुती म्हणून आपल्या देशाने क्रीडा क्षेत्रात जगाच्या नकाशावर मोठा लौकिक मिळवला असल्याचे पाटील यांनी म्हटले.
पाटील यांनी म्हटले कि, गेल्या काळात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक मिळविणाऱ्या क्रीडापटूंना शासकीय नोकरीमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय घेऊन क्रीडापटूंचा यथोचित सन्मानच केला आहे. आताही नमो चषकच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. यामुळेच नमो चषक या देशव्यापी स्पर्धेला देशासह महाराष्ट्र राज्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी भावना पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
यावेळी आ. माधुरीताई मिसाळ, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी काही योगपटूंनी योग प्रात्यक्षिके सादर करुन सर्वांची मने जिंकली.

Get real time updates directly on you device, subscribe now.