पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन केलं. यासोबतच विविध ठिकाणी भेटी देखील दिल्या. पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्र. ९ पाषाण, येथे ९ कोटी ३६ लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.
चंद्रकांत पाटील यांनी पुणे दौऱ्यावर असताना कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्र. ९ पाषाण, येथे ९ कोटी ३६ लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. विकास म्हणजे निरंतर सुरु राहणारी प्रक्रिया असून कोथरूडच्य विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे पाटील म्हणाले. भविष्यात कोथरूडच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही या वेळी पाटील यांनी दिली.