भाजपाची लोककल्याणकारी विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यास योगदान द्यावे, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

23
कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुणे दौऱ्यानंतर आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज कोल्हापूरमधील कौलव येथे शेतकरी, युवक मेळावा संपन्न झाला. या वेळी राधानगरी तालुक्याचे पंचायत समिती उपसभापती रविश उदयसिंह पाटील (कौलवकर) आणि समर्थकांनी चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पाटील यांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपाची लोककल्याणकारी विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यास योगदान द्यावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
संधीची समानता आणि विकासाचे राजकारण यामुळे आज राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीची पसंती भारतीय जनता पार्टी हीच आहे. यामुळेच हे विकासपर्व असेच सुरू ठेवण्यासाठी ‘अबकी बार चारसो पार’ हा नारा सत्यात उतरणार, हे स्पष्ट आहे. असे मत धनंजय महाडिक यांनी यावेळी मांडले.
यावेळी राजे समरजितसिंह घाटगे, भरमुअण्णा पाटील, राहुल देसाई, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, संभाजी आरडे, विलास रणदिवे, पवन महाडिक, विजय महाडिक, दीपक शिरगावकर, लहू जरग, अशोक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.