चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील प्रेरणा सोसायटी, आनंद नगर, पुजा हाईट्स येथे होळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी होऊन केले होळीचे पूजन
पुणे : आज होळी पौर्णिमा! सर्वत्र होळीचा सण आज आनंदाने साजरा केला जात आहे. या सणानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील प्रेरणा सोसायटी, आनंद नगर, पुजा हाईट्स येथे होळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी होऊन होळीचे पूजन केले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्व नागरिकांना होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. जे जे अमंगळ आहे, नकारात्मक आहे; ते ते सर्व होळीच्या पवित्र अग्निमध्ये दहन व्हावे, आपले जीवन सकारात्मक ऊर्जेने संपन्न व्हावे, अशी प्रार्थना पाटील यांनी या मंगल प्रसंगी केली.