पुण्याची राजकीय संस्कृती टिकवत कोणावरही वैयक्तिक टीका न करता माझ्या पार्टीचा विचार आणि विकासाचे मुद्दे हाच प्रचाराचा अजेंडा – मुरलीधर मोहोळ

146

पुणे : पुण्याच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विश्वात चर्चेचा विषय असणाऱ्या वाडेश्वर कट्ट्यावर आज लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा निमित्त आज पुण्यातील प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच कट्ट्यावर पहायला मिळाले. महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि अपक्ष उमेदवार वसंत मोरे आज येथे एकत्र कट्टयावर जमले होते. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी पुणे लोकसभेची निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवर पुणे शहराचे व्हिजन मांडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदारसंघात झालेली कामे यावरही त्यांनी चर्चा केली.

आजच्या या कट्ट्यावर पुण्यातील विविध विषयांवर गप्पा रंगल्या. विशेष म्हणजे पुणेकरांच्या समस्यांवर चर्चा झाली. वाहतूक कोंडी, प्रदूषण , पाण्याच्या समस्या पुणेकरांना असल्याचे समोर आले. याच समस्यांवर काम करणार असल्याचे यावेळी मोहोळ यांनी सांगितले. पुण्याची राजकीय संस्कृती टिकवत कोणावरही वैयक्तिक टीका न करता माझ्या पार्टीचा विचार आणि विकासाचे मुद्दे हाच प्रचाराचा अजेंडा असेल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

मोहोळ म्हणाले कि, मला पुण्याचं ५०, १०० वर्षांचं भविष्य घडवायचं आहे. केंद्र सरकारच्या दृष्टीने इथल्या प्रश्नांवर विचार केला पाहिजे. म्हणजे पुढील ५० वर्षांचा विचार आता करायला हवा. महापालिका महापौर, स्थायी समिती अध्यक्ष पाहता मला शहराचा आवाका माहित असल्याचे मोहोळ म्हणाले. मला पुण्याला सर्वोच्च स्थानावर न्यायचं आहे. भाजपसोबत राहून मला चांगलं काम करता येऊ शकत असा विश्वास असल्याचेही ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.