सांगली मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करा – चंद्रकांत पाटील

14
सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी जमलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद देखील साधला. या वेळी आ. सुधीर दादा गाडगीळही उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले , देशाच्या विकासाची गती वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अहोरात्र मेहनत घेत आहेत. याच आदर्शाचे पालन करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राज्य झपाट्याने प्रगती करते आहे. विकासाची ही गती आणखी वाढविण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत आपले मौल्यवान मत देऊन मा. मोदीजींचे हात बळकट करावेत. त्यासाठी सांगली मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.