चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेता श्रीनिवास करली यांच्या प्रभाग क्रमांक १९ मधील भाजपा पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

14

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेता श्रीनिवास करली यांच्या प्रभाग क्रमांक १९ मधील भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील म्हणाले , देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून आदरणीय मोदीजींनी अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. त्याचा कोट्यवधी देशवासीयांना लाभ झाला. त्यामुळे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी केले. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहचून संपर्कावर भर द्यावा, अशा सूचनाही पाटील यांनी याप्रसंगी केल्या.
यावेळी विधिमंडळातील सुभाषबापू देशमुख, मोहन डांगरे, श्रीनिवास करली, वरलक्ष्मी पुरुड, अर्जुन जाधव, अविनाश महागावकर, बसवराज केंगनाळकर यांच्या सह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.