मोठी बातमी: रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट, बोटीत आढळली शस्त्रास्त्रं

रायगड: रायगड जिल्ह्यातून धक्कादायक माहीती समोर आली आहे. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी बेवारस स्थितीत एक बोट आढळली आहे. या बोटीत शस्त्रास्त्रं सापडली आहेत. पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. पोलिसांनी रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी केला आहे.

हरिहरेश्वरमध्ये  शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळली आहे. ही बोट पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं किनाऱ्यावर आणली. या बोटीत एके-४७ रायफल आणि शस्त्रास्त्रं आढळून आल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या रायगड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

दरम्यान एटीएस प्रमुख विनित अग्रवालसह त्यांचे पथक रायगडकडे रवाना झाले आहेत. ही भरकटलेली स्पीडबोट असलेल्याची माहिती सुत्र देत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी ही बोट पकडली गेली त्यावेळी बोटीवर एकही व्यक्ती हजर नव्हती. त्यामुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. बोटवरती एकून तीन रायफल सापड्याची माहिती आहे, परंतु या रायफल डमी आहेत की ओरीजनल याचा तपास सुरु आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!