‘बिग बॉस मराठी सीझन ५’ … सर्वांना “वेड” लावणाऱ्या “लयभारी”होस्टसह प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच

109
मुंबई : प्रेक्षकांना बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा होती असा सर्वात लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. पाचवा सीझन एका नव्या सरप्राईझसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी होस्ट म्हणून महेश मांजरेकर यांच्या ऐवजी एका नव्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे.
बिग बॉस मराठीचा चाहता वर्ग खूप आहे. त्यामुळे पाचवा सिझन कधी येणार याची अनेक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. कलर्स मराठीकडून याबाबत मोठी उपडेट समोर आली आहे. बिग बॉस मराठीचे होस्टिंग आता असा अभिनेता करणार आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. हो अगदी बरोबर… तुमचा सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख.
कलर्स मराठी आणि जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शोची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे. मराठी मनोरंजनाचा “BIGG BOSS” सर्वांना “वेड” लावायला येतोय…”लयभारी”होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख !! फक्त कलर्स मराठीवर आणि JioCinema वर. असे कॅप्शन देत धमाकेदार प्रोमो समोर आला आहे. पुन्हा एकदा नव्या स्पर्धकांसह, नव्या होस्टसह, गॉसिप्स, धमाल, मस्ती आता लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.