बिग बॉस मराठी 3 च्या घरातून तृप्ती देसाई बाहेर

मुंबई: बिग बॉस मराठीच्या घरातला रविवारचा दिवस म्हणजे एलिमिनेशनचा दिवस. या दिवशी घरातून कोण बाहेर पडतं याची उत्सुकता, हुरहुर सगळंच महाराष्ट्राला लागून राहिलेलं असतं. रविवारी म्हणजेच 7 नोव्हेंबरला तृप्ती देसाई या घरातून बाहेर पडल्या.

महेश मांजरेकरांनी जेव्हा ही गोष्ट जाहीर केली केली की तृप्तीताई तुमचा या घरातला प्रवास आज इथे संपला आहे तेव्हा बिगल बॉस मराठीच्या घरात असलेल्या सगळ्याच सदस्यांचे डोळे पाणावले. तसंच ताईगिरी संपली हेदेखील या सदस्यांन जाणवलं.

कलर्स मराठीवरच्या या रिअॅलिटी शोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या घरात राडे, भांडणं, प्रेम अशा सगळ्याच गोष्टी पाहण्यास मिळत आहेत. गेल्या रविवारी अविष्कार दारव्हेकर हा स्पर्धक बाहेर पडला आणि आता कालच्या रविवारी तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या. उत्कर्ष, जय, विशाल निकम, विकास पाटील, सोनाली पाटील, मीरा, प्राजक्ता सगळ्यांनाच खूप जास्त वाईट वाटलं. सर्वात जास्त वाईट वाटलं ते उत्कर्षला कारण त्यानेच तृप्ती देसाईंना नॉमिनेट केलं होतं.

गेल्या आठवड्यात जो नॉमिनेशनचा टास्क पार पडला त्यामध्ये विशाल निकम, मीनल शाह, जय दुधाणे, सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई हे पाच सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यांच्यापैकी मीनल शाह आणि विशाल निकम हे दोन खेळाडू कालच सेफ झाले होते.

Read Also :