भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी नवी सांगवीत पावसाळापूर्व कामांची केली पाहणी… अधिकाऱ्यांना केल्या महत्वपूर्ण सूचना
पिंपरी – चिंचवड : गेल्या आठवड्यापासून सर्वत्र पावसाला सुरूवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही दोन दिवसांपूर्वी मोठा पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात पावसाळापूर्व कामे करण्यात ढिलाई केली आहे. शहराच्या अंतर्गत भागांमध्ये पावसाळापूर्व कामे बाकी आहेत. आज भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी नवी सांगवीतील मयूरनगरी, फेमस चौक, त्रिमूर्ती कॉलनी, कवडेनगर, समतानगर, गणेशनगर, स्वामी विवेकानंदनगर, साई चौक, भाजी मंडई या परिसरात जाऊन महापालिकेने केलेल्या पावसाळापूर्व कामांची नागरिकांना सोबत घेऊन पाहणी केली.
शंकर जगताप यांनी माहिती दिली कि, वेगवेगळ्या कामांसाठी रस्ते व रस्त्यांच्या कडेने खोदकाम केल्यानंतर ते अद्याप बुजविण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वास्तविक पावसाळा तोंडावर आल्याची जाणीव होऊन महापालिका प्रशासनाने खोदलेले रस्ते बुजविणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नसल्याचे या पाहणीत आढळून आले. त्यामुळे महापालिकेच्या स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिःसरण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना जागेवर बोलावून घेत पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना केली. खोदलेले रस्ते तातडीने बुजविण्याची कार्यवाही करावी. परिसरातील स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष द्यावे. नैसर्गिक आपत्ती सांगून येत नसल्याने आपत्ती प्रसंगात नागरिकांना दिलासा देणारी तत्पर सेवा पुरवावी. यापुढील काळात सतर्कतेने काम करावे, अशा महत्वपूर्ण सूचना जगताप यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, अंबरनाथ कांबळे, हर्षल ढोरे, सखाराम रेडेकर, बाळासाहेब देवकर, गणेश देवकर, प्रवीण पाटील, सुनील कोकाटे, डॉ. देविदास शेलार,संजय गांधी निराधार योजेनेचे सदस्य संजय मराठे, अतुल शिंदे, राजू नागणे, संदीप दरेकर, शुभम फरांदे, अशोक कवडे, सुरेश शिंदे, सुरेश तावरे, शैलेश जाधव, योगेश शितोळे, भाऊसाहेब जाधव, संदिपान सामसे, हरिश्चंद्र गायके, जगन्नाथ पाटील, दिलीपराव कदम, प्रशांत ढोरे, सचिन कोळमकर, शाहरुख सय्यद आदी उपस्थित होते.