भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कोअर कमिटीची बैठक संपन्न
नवी दिल्ली : भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती होती.
दिल्लीत पार पडलेल्या पक्षाच्या कोअर समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील अपयशाच्या कारणांवर विचारमंथन करण्यात आले. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. महायुतीतील तीनही पक्षांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी लवकरच समिती स्थापन करण्याचे देखील या बैठकीत ठरवण्यात आले. एकूणच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे निकाल, महायुती घटक पक्षांसोबत आगामी विधानसभेच्या रणनीतीवर यावेळी चर्चा करण्यात आली.
या वेळी राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोषजी, सहसंघटन सरचिटणीस शिवप्रकाशजी, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र सहप्रभारी अश्विनी वैष्णव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हे कोअर कमिटीतील सहकारीही उपस्थित होते.