महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून ५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल…चंद्रकांत पाटील यांनी सर्व उमेदवारांना विजयासाठी दिल्या शुभेच्छा

44

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजाताई मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे यांनी उमेदवारी अर्ज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल केला. या वेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यासोबतच योगेश टिळेकर यांनी देखील उमेदवारी अर्ज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल केला. यावेळी देखील पाटील यांनी उपस्थित राहून टिळेकर यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्व १२ उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखल केले. भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांनी अर्ज दाखल केले आहते. या सर्वाना चंद्रकांत पाटील यांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे विधानपरिषद निवडणुकीत आता ट्विस्ट आला आहे. ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आता १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक अटळ आहे.
विधानपरिषदेचे उमेदवार
भाजप : –  
पंकजा मुंडे
सदाभाऊ खोत
परिणय फुके
अमित गोरखे
योगेश टिळेकर
काँग्रेस :-
प्रज्ञा सातव
शिवसेना ठाकरे गट : –
मिलिंद नार्वेकर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट : –
जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट :-
शिवाजी गर्जे
राजेश विटेकर
शिवसेना : –
भावना गवळी
कृपाल तुमाने

Get real time updates directly on you device, subscribe now.