ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कोथरुडमध्ये “घरोघरी ज्ञानेश्वरी” या स्त्युत्य उपक्रमाची सुरुवात
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या मतदार संघात सुधारणा करण्यासाठी कायम तत्पर असतात. कोथरूडमध्ये जनतेच्या विकासासाठी ते विविध उपक्रम राबवत असतात. फिरता दवाखाना, फिरते वाचनालय यासारखे उपक्रम त्यांनी राबवलेत. नुकताच त्यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे, तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त कोथरुडमध्ये “घरोघरी ज्ञानेश्वरी” हा उपक्रम.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि , ज्ञानेश्वरांची अभंगगाथा म्हणजे नामभक्तीचा अलौकिक चैतन्यदीप! ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रचार आणि प्रसारासाठी मी प्रयत्नरत असल्याचे पाटील म्हणाले. कोथरूड मतदारसंघात प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी असावी या हेतूने ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त कोथरुडमध्ये “घरोघरी ज्ञानेश्वरी” हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमा अंतर्गत पाटील यांनी स्वतः कोथरूड मधील घरोघरी ज्ञानेश्वरी भेट दिली .
प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी असावी, या उद्देशाने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष उपक्रम हाती घेतला असून; या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी कोथरुड मधील वनाझ सोसायटी भागात झाला. चंद्रकांत पाटील यांनी स्वतः वनाझ सोसायटीतील नागरिकांच्या घरी जाऊन ज्ञानेश्वरी वाटप केले.
यावेळी मंदिर ट्रस्टचे संजय काळे, विकास जाधव, दिपक कुल, भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, नवनाथ जाधव, दिनेश माथवड, दुष्यंत मोहोळ, दीपक पवार, कांचन कुंबरे, विठ्ठल बराटे, सचिन मोकाटे, अंबादास आष्टेकर, अमित तोरडमल, प्रदीप जोरी, जयंत दशपुत्रे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.