फॅशन डिझायनिंग कोर्स कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातही विविध ठिकाणी सुरू करण्याचा मनोदय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोल्हापुरातील कनाननगर येथील फॅशन डिझायनिंचे प्रशिक्षण केंद्राला भेट दिली आणि माता भगिनींशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील कनाननगर येथे मोफत शिवण क्लास आणि फॅशन डिझायनिंग कोर्स उपलब्ध करून दिले आहेत. परिसरातील युवती आणि महिलांना घरबसल्या काम मिळावे आणि त्यांना आर्थिक हातभार लागावा, यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या ठिकाणी महिलांना फॅशन डिझायनिंचे प्रशिक्षण दिले जाते. सोबतच त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते. या प्रशिक्षण केंद्राला पाटील यांनी भेट दिली. येथील माता भगिनिंशी संवाद साधताना स्त्री आर्थिक दृष्ट्या सक्षम बनली तर संपूर्ण कुटुंबाला उर्जितावस्था प्राप्त होते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. अशाच प्रकारचे फॅशन डिझायनिंग कोर्स कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातही विविध ठिकाणी सुरू करण्याचा मनोदय याप्रसंगी पाटील यांनी व्यक्त केला.